सांगली आणि मिरजेत आज दिवसभरात आढळले 8 पॉझिटिव्ह
सांगली आणि मिरजेत आज दिवसभरात आढळले 8 पॉझिटिव्ह : महापालिका प्रशासनाकडून खबरदारीचे उपाय सुरू: मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिल्या भेटी
सांगली : सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका हद्दीत आज शनिवारी दिवसभरात आठ नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये सांगली मिरजेतील रुग्ण आहेत. नव्या तीन रुग्णांची माहिती मिळताच मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या सूचनेनुसार सर्व ठिकाणी कंटेनेमेन्ट झोन आणि औषध फवारणीबाबत नियोजन करण्यात आले. तसेच सायंकाळी उशीर 5 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत
सांगली महापालिका क्षेत्रात आज नव्या आठ रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये मिरजेतील ब्राम्हणपुरी , कोल्हापूर रोड आणि सांगलीतील विठ्ठलनगर आणि कोल्हापूर रोड गुप्ते हॉस्पिटल रोड येथील आशा तीन रुग्णाचा समावेश आहे. यातील ब्राम्हणपुरीमधील रुग्ण हा मिरजेतील एका खासगी रुग्णालयातील डॉक्टरच्या संपर्कातील आहे तर सांगलीच्या विठ्ठलनगर परिसरातील महिला ही 100 फुटी रोडवरील एका खासगी रुग्णालयात कामास आहे. तिसरा महिला रुग्ण ही सांगलीच्या कोल्हापूर रोड कुस्ती आखाड्यासमोर राहनेस आहे. या तिन्ही ठिकाणी महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी भेट देत खबरदारीच्या उपाययोजनांबाबत सूचना दिल्या. या पार्श्वभूमीवर मनपाचे उपायुक्त स्मृती पाटील , आरोग्यधिकारी डॉ रवींद्र ताटे , डॉ सुनील आंबोळे यांच्या टीमकडून औषध फवारणी आणि कंटेनेमेन्ट झोनबाबतचे नियोजन केले जात आहे. सांगलीत चौगुले प्लॉटमध्ये सहायक आयुक्त सहदेव कावडे, स्थानिक नगरसेवक युवराज बावडेकर, सुबराव मद्रासी, सहायक आरोग्यधिकारी डॉ वैभव पाटील, शीतल धनवडे, स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर, याकूब मद्रासी प्रणिल माने, धनंजय कांबळे , वैभव कुदळे , अतुल आठवले आणि गणेश माळी यांच्या टीमकडून औषध फवारणी करण्यात आली. याचबरोबर सायंकाळी उशिरा आणखी पाच मनपा क्षेत्रातील 5 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून त्या रुग्णांची माहिती काढून पुढील कार्यवाही केली जात असल्याचे आयुक्त नितीन कापडणीस यांनी सांगितले.