सांगली आणि मिरजेत आज दिवसभरात आढळले 8 पॉझिटिव्ह
सांगली आणि मिरजेत आज दिवसभरात आढळले 8 पॉझिटिव्ह : महापालिका प्रशासनाकडून खबरदारीचे उपाय सुरू: मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिल्या भेटी सांगली : सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका हद्दीत आज शनिवारी दिवसभरात आठ नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये सांगली मिरजेतील रुग्ण आहेत. नव्या तीन रुग्णांची माहिती मिळताच मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या सूचनेनुसार सर्व ठिकाणी कंटेनेमेन्ट झोन आणि औषध फवारणीबाबत नियोजन करण्यात आले. तसेच सायंकाळी उशीर 5 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत सांगली महापालिका क्षेत्रात आज नव्या आठ रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये मिरजेतील ब्राम्हणपुरी , कोल्हापूर रोड आणि सांगलीतील विठ्ठलनगर आणि कोल्हापूर रोड गुप्ते हॉस्पिटल रोड येथील आशा तीन रुग्णाचा समावेश आहे. यातील ब्राम्हणपुरीमधील रुग्ण हा मिरजेतील एका खासगी रुग्णालयातील डॉक्टरच्या संपर्कातील आहे तर सांगलीच्या विठ्ठलनगर परिसरातील महिला ही 100 फुटी रोडवरील एका खासगी रुग्णालयात कामास आहे. तिसरा महिला रुग्ण ही सांगलीच्या कोल्हापूर रोड कुस्ती आखाड्यासमोर राहनेस आहे. ...